
कोल्हापूर: महानगरपालिकेतील घरफाळा वसुलीमध्ये झालेल्या अनेक गैरव्यवहार झाले आहेत. संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे, मिळकतीच्या क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिले देऊन त्रास देणे, बनावट दुबार पावत्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान करण्यात आले.हा घोटाळा नेमका किती झाला याचा होशोब लागून नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम आदमी पार्टी आयुक्तांकडे खालील मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. 2010 मध्ये संगणकीय प्रणाली सुरू केल्याच्या 3 वर्षे आधीपासून, म्हणजेच 2007 पासून ते आता पर्यंतच्या घरफाळा वसुलीचे त्रयस्थ विश्वासू संस्थेकडून ऑडिट करण्यात यावे. घरफाळा निश्चित करणारी संगणकीय प्रणाली सदोष आहे. त्यामध्ये परस्पर बदल करता येऊ शकतात. त्यामुळे आता वापरत असणारी संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) पूर्णतः बदलून नवीन प्रणाली विकसित करून घ्यावी जेणेकरून असे घोटाळे कायमचे थांबवता येतील.2012 पासून जवळपास 6500 मिळती Invalid दाखवण्यात आल्या. या Invalid मिळकतीवर लागू असलेली घरफाळा रक्कम सार्वजनिक करून त्याची वसुली करावी. संबंधित मिळकती Invalid दाखवणाऱ्या तत्कालीन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करत रक्कम वसूल करण्यात यावी. जी आय एस (GIS) मॅपिंग प्रणालीचे काम अर्धवट आहे. ते पूर्ण करून शहरातील मिळकतीचे क्षेत्रफळ निश्चित करावे व घरफाळा लागू करावा.सन 20-21 च्या बजेटमध्ये 88 कोटींची चालू मागणी दाखवण्यात आली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार एकूण 253 कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. एवढी रक्कम थकबाकी असताना फक्त 88 कोटींची चालू मागणी का दाखवण्यात आली याची चौकशी करावी.वरील मागण्यांवर त्वरित कार्यवाही करून महापालिकेचे नुकसान त्वरित भरून निघण्याच्या उद्देशाने निर्णय व्हावेत अशी मागणी करण्यात आली.मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, लाला बिरजे, गिरीश पाटील, वैशाली कदम, विशाल वठारे, बसवराज हदीमनी, दत्तात्रय सुतार, बाबुराव बाजारी, रामचंद्र गावडे, कृष्णात सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Leave a Reply