गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन दुवा म्हणून काम करेल :अध्यक्ष पुरुषोत्तम काळे

 

कोल्हापूर: गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन संस्था व ग्राहक यांना जोडण्याचे काम दुवा म्हणून करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी केले.नुकत्याच स्थापन झालेल्या गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनची पहिली बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेची ध्येयधोरणे, सभासद वाढविणे आणि एकूण कामकाज कशा स्वरूपाचे असावे, याविषयी बैठकीत चर्चा झाली.दरम्यान, या संस्थेचे पदाधिकारी असे – पुरुषोत्तम काळे (मुंबई), अध्यक्ष, राजेंद्र दिंडोकर (नाशिक) कार्याध्यक्ष  नचिकेत भुर्के (कोल्हापूर) उपाध्यक्ष, चेतन राजापूरकर (नाशिक) उपाध्यक्ष, भरत ओसवाल (कोल्हापूर) समन्वयक, दीपक देवरूखकर (मुंबई) कोषाध्यक्ष, कालिदास कांदळगावकर (मुंबई) सह कोषाध्यक्ष, संजय वाघ (ठाणे) सचिव, सतीश पितळे (मुंबई) सहसचिव, समीर शहा (नवी मुंबई) सदस्य, संतोष भडेकर (मुंबई) सदस्य, नितीन कदम (मुंबई), सदस्य, विश्वनाथ जाधव (लातूर) सदस्य आणि नितीन खंडेलवाल (अकोला), अजित पेंडूरकर (मुंबई), आनंद पेडणेकर (मुंबई), राजाभाऊ वाईकर (पुणे) तज्ज्ञ मार्गदर्शक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!