शशांक केतकरचे झी मराठीवर पुनरागमन

 

सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय. आता ह्या मालिकेत तो कुठल्या भूमिकेत असणार हे सरप्राईझ असणार आहे, शशांक सोबत ह्या मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा ह्या दोघांसोबत दिसेल. त्यामुळे जरा उत्सुकता ताणून धरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!