Information

‘ झोंबिवलीचा’ टिझर लाँच !पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर- कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला.

February 25, 2021 0

फास्टर फेणे, क्लासमेट्स,  माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ‘ झोंबिवली ‘ हा  सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली  होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल. २०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने  आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे. मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात. ह्या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात,मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले,  तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे  चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल.आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत ह्या सिनेमाचे शूटिंग केले. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे.”असा हा भव्य चित्रपट अनेक अर्थांनी अनोखा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा आवर्जून पाहावा.

No Picture
News

प्रारुप मतदार याद्यातील घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका:राहूल चिकोडे

February 25, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १६/०२/२०२१ रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या. या यादयांवर आक्षेप घेण्यासाठी दिनांक २३/०२/२०२१ हा अंतिम दिवस होता.  प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर या प्रारूप […]

News

नाबार्डचे केडीसीसी बँकेला डिजिटल व्यवहार प्रणालीसाठी सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

February 25, 2021 0

कोल्हापूर:नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्व गावे, दुर्गम वाड्या-वस्त्यावरील ग्राहकांना एटीएम सेवा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता ४५ लाख रुपये तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट (किसान क्रेडिट कार्ड) सुविधेपोटी १२ लाख रुपये याप्रमाणे […]

News

३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

February 25, 2021 0

मुंबई:राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही. ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी आज येथे ही घोषणा केली.सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटपर्यंतच्या) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास […]

News

खासदार संभाजीराजे छत्रपती यांची रायगड किल्ल्यास भेट

February 25, 2021 0

रायगड : विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज रायगड किल्ल्यास भेट दिली. सुरूवातीस रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी करून काही सूचना दिल्या. यानंतर हत्ती खान्यानजीक प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी तसेच […] […]

News

कमी खर्चातील, आपत्तीपुरक घरकुलांची होणार निर्मिती: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

February 23, 2021 0

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली. राज्यात स्थानिक भौगोलिक […]

News

जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने परिषद संपन्न

February 23, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कोल्हापूरमधील सर्व सभासदांसाठी परिषद आयोजित केली होती. यावेळी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरीष पाटील व सचिव डॉक्टर अरुण धुमाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जानकी हॉस्पिटलच्या डॉ. […]

News

भारतीय आयुर्विमा मंडळाचे विकासराव यांचे कागल कार्यालयात जोरदार स्वागत

February 22, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक विकासराव यांनी नुकतीच कागल येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. कागल येथील कार्यालयाने अवघ्या तीन महिन्यांमध्ये २६००  पॉलिसी व १ कोटी ८० लाख रूपये प्रीमियम आणला […]

News

वीज तोडणी थांबवा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्याचा आपचा इशारा

February 18, 2021 0

कोल्हापूर: वाढीव विजबिलांमुळे वीज ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. परंतु महावितरण कार्यालयाकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. वाढीव विजबिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलन केले जात आहे. हा प्रश्न राज्य सरकारकडे […]

News

म्‍हारुळ गावच्‍या दूध संस्‍था कर्मचा-यांचा गोकुळतर्फे सत्‍कार

February 17, 2021 0

कोल्‍हापूर :१७. करवीर तालुक्‍यातील म्‍हारूळ येथील दूध संस्‍था कर्मचा-यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्‍याबद्द गोकुळ परिवारातर्फे गावातील दूध संस्‍था कर्मचा-यांचा तसेच संघाचे लिंगनूर  सेंटरचे सिनी.विस्‍तार सुपरवायझर श्री.वसंतराव बाबूराव घुरे  हे संघाच्‍या सेवेतून निवृत्‍त झाल्‍याबद्दल व केनवडेचे […]

1 2 3
error: Content is protected !!