
कागल:मंगळवार झालेल्या सरपंच निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. कागल तालुक्यात एकूण ५३ सरपंच निवडी झाल्या, त्यापैकी तब्बल ३१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यासरपंचांच्या निवडी झाल्या. शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाचे नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाले. शिवसेनेच्याच खासदार प्रा. संजय मंडलिक गटाचे एकूण सहा सरपंच झाले.राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या निवड झालेल्या ३१ गावांमध्ये सुळकुड, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, शंकरवाडी, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, केनवडे, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, बिद्री, उंदरवाडी, अर्जुनी, लिंगनूर कापशी, खडकेवाडा, नानीबाई चिखली, कौलगे, माद्याळ, वडगाव, तमनाकवाडा, आलाबाद, कासारी, मागनूर, बेलेवाडी मासा, बोळावीवाडी, करंजीवणे या गावांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सरपंच झालेल्या नऊ गावांमध्ये शेंडूर, गोरंबे, म्हाकवे, बानगे, साके, भडगाव, सोनगे, यमगे, हसुर खुर्द या गावांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्याच खासदार संजय मंडलिक गटाचे सरपंच झालेल्या सहा गावांमध्ये बस्तवडे, सोनाळी, गलगले, कुरुकली, हळदी, मेतके या गावांचा समावेश आहे.
Leave a Reply