जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने परिषद संपन्न

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कोल्हापूरमधील सर्व सभासदांसाठी परिषद आयोजित केली होती. यावेळी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे
अध्यक्ष डॉ. शिरीष पाटील व सचिव डॉक्टर अरुण धुमाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जानकी हॉस्पिटलच्या डॉ. गीता पिलाई, डॉ. प्रवीण कुमार जाधव यांनी स्त्रियांमधील सर्व प्रकारचे कॅन्सर यावर सविस्तर माहिती यावेळी दिली. कॅन्सरचे निदान लवकर कळले व त्यावर वेळीच व योग्य उपचार मिळाल्यास कॅन्सर १००% बरा होतो असे नमूद केले. यासाठी जीपीएच्या माध्यमातून महिला जागृती करणे आवश्यक आहे असे सांगितले. या कार्यक्रमास जीपीएचे सर्व कार्यकारी संचालक डॉ. उद्यम व्होरा,डॉ.विलास महाजन, डॉ. शिवराज देसाई,डॉ शिवपुत्र हिरेमठ, डॉ.उषा निंबाळकर, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अजित कदम,डॉ. महादेव जोगदंडे,डॉ. विनायक शिंदे उपस्थित होते. यावेळी आभार डॉ. अरुण धुमाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!