
कोल्हापूर : कोरोना लसीकरण केंद्र सकाळी सात पासून सुरु करावे, लस किती उपलब्ध आहे याची माहिती केंद्रावर एक दिवस बोर्डवर जाहिर करावी अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. कादबंरी बलकवडे यांना दिल्या.
कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी लस प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर शहरातही मोठया प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेतलेली आहे ; मात्र मागणीच्या तुलनेत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नागरीकांच्या रांगा सकाळी ७.०० वाजलेपासून लागलेल्या असतात, तर लसीकरण केंद्र सुरू होते सकाळी ९.३० ते १०.०० वाजता सुरू होते. तसेच लसीकरण केंद्र सुरु होताच लसीकरणे केंद्राबाहेर लस संपली असा बोर्ड लावला जातो. त्यामुळे नागरीक व आरोग्य कर्मचारी यांच्यात रोज वाद होतात. त्यामुळे नागरिकांची मागणी व वाढत्या उन्हाच्या तडाक्याचा विचार करून लसीकरण केंद्र सकाळी ७.०० वाजता सुरू करावेत. लसीकरण केंद्रावर किती लस उपलब्ध आहेत याची माहिती एक दिवस अगोदर बोर्डवर जाहिर करावी आणि तेवढयाच नागरिकांना टोकन देऊन प्राधान्य क्रमाणे लस दयावी. लसीकरण केंद्रावर पिण्याचे पाणी व बैठक व्यवस्था करावी व शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी अशा सुचना आमदार जाधव यांनी आयुक्त डॉ. बलकवडे यांना दिल्या आहेत.
Leave a Reply