
कोल्हापूर:१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने महापालिकेचे सफाई कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, केबल चालक, रिक्षा चालक, महिला कर्मचारी, आशा वर्कर, सिस्टर यांचा सत्कार राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे हस्ते मिठाई, रोपे, फेटे बांधून करण्यात आला. यावेळी सर्वांचे स्वागत जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील यांनी केले यावेळी बोलताना वसंतराव मुळीक यांनी महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देऊन ते म्हणाले कामगार हे महाराष्ट्राची शान आहेत कोरोनाच्या काळात ही आपल्या जीवाची पर्वा न करता सफाई कर्मचारी, आशा वर्कर व दवाखाण्यातील कर्ममचारी आपले काम प्रामाणिक पणे करत आहेत. त्यांच्या मुळे आज अन सर्वजण सुरक्षीत व व्यवस्थीत आहोत अश्या सर्व कामगारांना मानाचा मुजरा त्याच बरोबर असंघटीत कामगार व लहान व्यापाऱ्यांना लवकरच राष्ट्रीय निवृत्ति योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी ही त्यांनी केली यावेळी महादेव पाटील, रमेश कार्वेकर, दिपक चव्हाण, मारुती पोवार, महादेव केसरक, दिपक कांबळे, अभिजित पाटील, सारिका पाटील, भारती पाटील, अंजना पाटील यांच्यासह कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply