ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल तालुक्याच्या लसीकरणाचा प्रारंभ

 

कागल: ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल तालुक्याच्या कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात गलगले ता. कागल येथील उपसरपंच सतीश विजयराव घोरपडे यांना प्रतिबंधक लस देऊन हा प्रारंभ झाला.यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सबंध महाराष्ट्रभरातील जनतेच्या आरोग्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील सहा कोटी जनतेला लस देण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढून साडेसहा हजार कोटी रुपयांचा एकरकमी धनादेश देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज या लसीकरणाचा प्रारंभ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!