
गोकुळ निवडणूक; विरोधकांच्या बाजूने कल
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या म्हणजे विरोधी आघाडीच्या बाजूने लागले आहे.या आघाडीचे मागास उमेदवार अमरसिंह पाटील हे ४३६ मतांनी विजयी झाले .मागासवर्गीय उमेदवार डॉ.सुजित मिणचेकर हे ३४६ मतांनी तर बयाजी शेळके हे २३९ मतांनी विजयी झाले. महिला प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चुरस असून सुमारे १०० मतांचे मताधिक्य घेतले आहे. गोकुळच्या मतमोजणी महिला गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दुसऱ्या फेरीअखेर शौमिका महाडिक , अनुराधा पाटील, स्मिता पाटील पिछाडीवर आहेत . तर,आतापर्यंत मोजलेल्या नऊशे मतांमध्ये विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर यांनी आघाडी घेतली आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी गटातील मतमोजणीला प्रारंभ झाला असून महिला ओबीसी अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून पालकमंत्री सतेज पाटील- कामगार मंत्री, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीच्या दिशेने कौल दिसू लागला आहे. हे निकाल सत्तातंराचे संकेत आहेत काय या विषयीही पश्चिम महाराष्ट्रात ऊत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मल्टिस्टेटच्या मुद्याने दूध उत्पादक शेतकरी यांच्यात नाराजी होती ती या निकालाच्या रूपाने बघायला मिळत आहे. दुधाला जादा 2 रु दर देणार, मल्टीस्टेट ला घशात घालायचा प्रयत्न करत होते, मल्टीस्टेटच्या विरोधामुळे शेतकऱ्यांचा दूध उत्पादक संघ हा शेतकऱ्यांचाच राहणार हा विश्वास दूध उत्पादकांना निर्माण झाल्यामुळे पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाल्याचे दिसते आहे, असे मिणचेकार यांनी सांगितले.
असाच कल पुढील उमेदवारांच्या बाबतीत हाच कल राहील असे विजयी उमेदवार डॉ. सुजित मिनचेकर यांनी सांगितले.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली याबद्दल विजयी उमेदवार बयाजी शेळके यांनी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.
Leave a Reply