
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनंतर सत्तापालट झाला. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला धूळ चारत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीने मतमोजणीत बाजी मारत महाडिक गटाच्या हातून काढून गोकुळची सत्ता काबीज केली.ज्याच्या हाती गोकुळची सत्ता त्यांच्या हाती जिल्ह्याची आर्थिक आणि राजकीय सत्ता असे समीकरण असल्याने गोकुळ निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार व मंत्र्यांची इर्शा पणाला लागली होती. निवडणुकीसाठी इर्ष्येने जवळ जवळ शंभर टक्के मतदान झाले. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी तसेच विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यामध्ये गेल्या महिनाभरापासून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता कोण काबीज करणार याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी गेल्या एक दोन महिन्यांपासून रणधुमाळी सुरु होती. सतारूढ राजर्षी शाहू आघाडी विरूध्द राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत ही लढत आहे . सतारूढ राजर्षी शाहू आघाडीचे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील. अरूण नरके, माजी खासदर धनंजय महाडीक,संजय घाटगे व अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी केले. तर विरोधी पँनेलसाठी पालकमंत्री सतेज पाटील कामगार मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- खा. संजय मंडलिक. आमदार विनय कोरे, माजी आ. चंद्रदिप नरके आदी नेत्यांनी केले. गोकुळचे एकुण मतदार ३६४७ असून यामध्ये पुरुष मतदार २७६५, तर ८८२ स्त्री मतदार होते. एकूण ३२८९ मतदारांनी मतदान झाले होते.
Leave a Reply