
कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून आठ तर राज्य शासनामार्फत सहा अशा एकूण चौदा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषयी वर्तविण्यात आलेल्या तिसऱ्या लाटेचे संकट जिल्ह्यावर आलेच तर, त्याची पूर्वतयारी म्हणून ‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत जिल्ह्यात 14 ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यात जिल्हा नियोजनमधून सी.पी.आर, आयसोलेशन रुग्णालय, आय.जी.एम, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, ग्रामीण रुगणालय गारगोटी, मलकापूर, राधागनरी येथे प्राणवायू निर्मिती प्रकल्प तर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे प्राणवायू बुस्टर प्रकल्पाचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय शिरोळ, चंदगड, आजरा, कागल आणि गगनबावडा येथील पी. एस. ए. प्राणवायू निर्मिती प्रकल्प राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात आले आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्याची 50.93 मे.टन प्राणवायूची एकूण मागणी असून सद्यस्थितीत कोल्हापुरातून 35 मे. टन प्राणवायूचा पुरवठा होत असून जिल्ह्यातील दैनंदिन रुगणांची वाढ लक्षात घेवून 63.66 मे.टन इतक्या प्राणवायूची भविष्यात गरज लागणार आहे.प्रस्तावित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मधून 23 मे. टन प्राप्त होणार आहे. अंदाजे 1800 प्रतिदिवस इतके सिलेंडर भरण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यातून 1200 इतक्या रुग्णांच्या प्राणवायूची गरज यातून भागणार आहे.
Leave a Reply