
कागल:कागल तालुक्यात रविवारपासून (दि.९) बुधवारपर्यंत (दि.१९) दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सक्त सूचना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यू अत्यंत कडक करा, कुणालाही बाहेर पडू देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.कागलमध्ये कोरोनाच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, या दहा दिवसांच्या काळात दूध व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तसेच पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवांना पेट्रोल देण्यासाठी सकाळीच सुरू राहतील. तालुक्यातील कसबा सांगाव, मौजे सांगाव, व्हन्नुर व वंदूर या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या गावांना रेड अलर्ट एरिया जाहीर करून अँटीजन व आरटीपीसीआर टेस्टसह लसीकरणही वाढवा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Leave a Reply