
कोल्हापूर:शहरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना एम्ब्युलन्स ची गरज भासत आहे. सर्वच रुग्णांना ही सुविधा परवडत नसल्यामुळे त्यांची हेळसांड होते, अनेकवेळेला वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून आम आदमी पार्टीच्या वतीने रिक्षा एम्ब्युलन्स सुरू करण्यात आली आहे.यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरची सोय देखील असणार आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर ही सेवा कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध होणार आहे. या रिक्षा एम्ब्युलन्स सुविधेची गरज लागणाऱ्या रुग्णांनी रिक्षाचालक संघटनेचे विजय भोसले यांना 9850089441 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘आप’च्या वतीने करण्यात आले आहे.या रिक्षा एम्ब्युलन्स सेवेचे उदघाटन ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, मोईन मोकाशी, विशाल वाठारे, आप रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राकेश गायकवाड, बाबुराव बाजारी, मंगेश भोसले, आदी उपस्थिती होते.
Leave a Reply