रेमडेसिवीर समज गैरसमज आणि पर्याय :डॉ.प्रकाश संघवी

 

कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगाने पसरवा आणि त्यावर उपयुक्त ठरणारं (? )रेमरेसिव्हीर इंजेक्शनच्या वादाला प्रारंभ झाला. या इंजेक्शनची कृत्रिम टंचाई, काळा बाजार यासह इतर वाद निर्माण झाले. हे इंजेक्एू कोरोनावर उपयुक्त ठरत नाही असा निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतानी जाहिर केले आणि नव्या वादाला तोंड फुटले या सर्व पार्श्वभूमीवर प्रख्यात बाल रोग तज्ञ आणि राष्ट्रीय स्तरावरील बालरोग तज्ञ परिषदेचे पदाधिकारी डॉ. प्रकाश संघवी यांचा हा माहितीपूर्ण लेख.
आज संपूर्ण भारतभर एकाच गोष्टीची चर्चा आहे ते म्हणजे रेमडेसिवीर जणू काही हे कल्पवृक्षाचे फळ आहे ज्याने मरणारा पुन्हा जिवन मिळवितो. जणू काही जादूची कांडी !
काय आहे हे राम्डेसिवीर काही वर्षांपूर्वी या औषधाचे नाव लोकांनाच काय तर डॉक्टरांना सुद्धा माहित नव्हते. हे एक विषाणू विरोधी औषध असून अमेरिकनकंपनी Jilead Sciences ने हे औषध शोधून काढाले. हे एक बऱ्याच प्रकारच्या व्हायरल आजारावर वापरले जाणारे औषध असून ते SARS – COV – 2 Virus साठी पण वापरले जाऊ शकते हे औषध म्हणजे संजीवनी नव्हे. भारतात सुद्धा आपत्कालीन परिस्तिथीत हे औषध वापरणेस परवानगी देणेत आली आहे.
आज सुद्धा या औषधाच्या साईड इफेक्टच्या ज्या पद्धतीने संशोधन चाचण्या व्हायला हव्यात तश्या त्या झालेल्या नाहीत. या सर्व गोष्टींची माहिती रुग्ण व नातेवाइकांना देऊन त्यांच्या परवानगीनेच हे औषध वापरायचे आहे.
कोरोना आजाराचे व मृत्यूवचे भय हे आज सर्व नागरिकात पसरले आहे . त्या भया पोटी लोक स्वतःहून डॉक्टरांकडे या उपचाराची मागणी करत आहेत . ही एक वावटळ आहे. आजही आपल्या देशात सुशिक्षित अशिक्षित सर्व मानतात . गणपतीची मूर्ती दूध पिते अशा शेकडो गोष्टींवर आपले नागरिक विश्वास ठेवतात . अशाने अंधश्रद्धा फोफावतात वैदकीय भाषेत अशा घटनांना Mass Psychosis म्हणतात . या भयापोटी राम्डेसिवीर चा वापर आत्यंतिक प्रमाणात वाढला . मरता क्या नही करता या भीतीने ८५ ते ९० टक्के लोकांना ज्यांना अतिशय सौम्य प्रकारचा आजार आहे ते सुद्धा या औषधाच्या मागे धावू लागले त्याचाच परिणाम याची कमतरता तयार झाली . साठेबाजी सुरु झाली .
भ्रष्टाचार प्रमाणेच साठेबाजी व बनावटगिरी करून पैसे कमावणे हा आपल्या देशाला मिळालेला शाप आहे. हे इंजेकशन शिरेतून रोज एकदा ५ ते १० दिवस दिले जाते . साधारणपणे १/२ तास ते २ तास इतके हळू ते शिरेतून द्यावयाचे असते . नुकतेच गुजरातमदे २,७३,००० खोट्या व्हायल सापडल्या . या आधी किती हजार लोकांनी खोटी इंजेकशन घेतली हे देवाला माहिती.
लाखो लोकांनी हजारो रुपयांना काळ्या बाजारात ही इंजेकशन खरेदी करून सामान्य लोकांच्या हृदयात धडकीच भरवली.
WHO – जागतिक आरोग्य संघटनांनी सुद्धा रेमडेसिवीर COVID -19 मधील वापराबद्दल हिरवा सिग्नल दिलेला नाही आज सुद्धा इंग्लंड , यूरोप , अमेरिकेत सुद्धा हे औषध फार सीमित व अगदी आवश्यक अश्याच ठिकाणीच वापरले जाते. जगातील सर्व शास्त्रज्ञ तसेच तज्ज्ञ डॉक्टर्स या औषधाच्या वापराबद्दल साशंक असतात आपल्या देशात २१व्या शतकात हे घडले या सारखे दुर्दैव नाही.
ज्या औषधाचा वापर अगदी सुरवातीच्या १ ते ९ दिवसातच करायला हवा तो सुद्धा अत्यंत आवश्यक असल्यास व्हायरल लोड कमी करण्यासाठी वापरला जाणे आवश्यक आहे त्याच्या सरसकट वापराने एका महाभयानक आपत्तीला आपण सामोरे जात आहोत . भविष्यात या औषधाच्या वापराने होणारे हृदयावरचे रक्तातले व इतर दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत.
डॉक्टरांनी सुद्धा याचा वापर केला नाही म्हणून Covid रुग्ण दगावला व आपल्यावर कोर्ट केसेस होतील या भीतीने याचा वापर न करता वेळोवेळी WHO , ICMR यांचा प्रोटोकॉल पाळण्यास भीती बाळगण्याची गरज राहणार नाही .
आपल्या देशाची लोकसंख्या १३५,००००० आहे . दररोज ४,००,०००. याप्रमाणे नवीन केसेस गृहीत धरल्या तरी २ महिन्यात २ १/२ कोटी लोकांना हा आजार होऊ शकेल त्यातील सुद्धा ९५% लोकांना हा आजार नुसताच स्पर्श करून जातो . अशा परिस्थितीत पुढील २ महिन्यात आपण जरी गृहीत धरले तरी साधारणपणे २ ते ३ लाख रुग्णांना या आजारासाठी ऍडमिट व्हावे लागेल . अशा परिस्थितीत १३४,००००० लोकांनी भयभीत होऊन दिसेल त्या औषधामागे धावून भय पसरवणे हे जास्त हानिकारक आहे . जेव्हा १०० पैकी ९८ लोक सुखरूप राहू शकतात त्याच वेळी २% लोकांच्या काळजी साठी मोठ्या धाडसाने पुढे यावे व ९८% नियमांचे पालन करावे .वस्तुस्थिती अशी दिसते कि लोक २% नियमांचेच पालन करतात . अशा वेळी लोकांनी इतर कोणत्याही गोष्टींमागे न धावता नियमांचे पालन करून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे हि आग्रहाची विनंती. 

डॉ.प्रकाश संघवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!