शिवसेनेकडून सीपीआर रुग्णालयास रु.५० लाखांचे व्हेंटीलेटर

 

कोल्हापूर : कोरोना महामारीचे संकट राज्यावर घोंगावत असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास रु.५० लाखांचे व्हेंटीलेटर प्रदान करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत पाच व्हेंटीलेटर सीपीआर प्रशासनाकडे प्रदान करण्यात आले. यावेळी कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक सेवा पुरवू, यासह सीपीआर रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांनी केले.यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर म्हणाले आरोग्य यंत्रणा सुसज्ज व सक्षम असावी, असा आपला नेहमीच प्रयत्न आहे. त्यामुळे गतवर्षी सीपीआर मधील कोव्हीड सेंटर असो किंवा रु.एक कोटींचे बेड व कपाटे यांची मदत असेल. नेहमीच सीपीआर रुग्णालय सुसज्ज करण्यावर भर दिला जात आहे.सीपीआर रुग्णालयात कोल्हापूर सह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सीमाभागातून रुग्ण दाखल होण्याची संख्या अधिक आहे. या रुग्णांना व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता असल्याने सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून शिवसेनेच्या वतीने सीपीआर रुग्णालयास अत्यावश्यक अशी व्हेंटीलेटर आज प्रदान करण्यात आली. पुढील काळात अशाच पद्धतीने सीपीआर रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकरिता प्रयत्न करू, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.यावेळी जिल्हाधिकारी श्दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ.अजित लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, डॉ.अनिता सैबनवार, डॉ.विजय बर्गे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी परिवहन सभापती अजित मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना उपशहर प्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, किशोर घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!