आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा

 

कोल्हापूर : रिक्षा चालकांची सोय व्हावी या उद्देशाने आमदार चंद्रकांत जाधव यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले. आणणांचा हा उपक्रम कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे गौरवउद्गार पालकमंत्री व परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
परवाना धारकांना रिक्षा चालकांना राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या 1500 रूपयांच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आमदार चंद्रकांत जाधव यांनी खासबाग येथील कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज या सुविधेला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यशासनाने कडक संचारबंदी लागू केली. यामध्ये फेरीवाले, रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना 1500 रूपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. कोल्हापुरातील 15 हजार रिक्षा चालकांना अनुदान मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. रिक्षा चालकांच्या सोयीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी अर्ज करण्याची सुविधा मंगळवार पेठ, खासबाग येथील कार्यालयामध्ये केली आहे. या सुविधेचे उदघाटन आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नोंदणी पूर्ण झालेल्या १५ रिक्षाचालकांना नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा चालकांच्या हस्ते रोप देऊन पालकमंत्री पाटील व आमदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.शहरातील 450 हून अधिक रिक्षा व्यावसायिकांना अर्ज केले आहेत. आजरा, चंदगड, शाहुवाडी येथूनही फोन येत आहेत. 7O जणांची नोंदणी झाली आहे. आरटीओ विभागाकडून अर्जाची पडताळणी होऊन तात्काळ त्यांच्या खात्यावर 1500 रूपये जमा होणार आहेत. अनुदानासाठी जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज करून घ्यावेत, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.रिक्षा चालकांना आधार लिकिंग करीता महा ई सेवा केंद्र सुरू करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली असून, परवाना धारकांना रिक्षा चालकांसोबतच रिक्षा ड्रायव्हरनांही आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.ऑनलाईन अर्ज, ओटीपी, लिंकीग असले काहीच प्रकार माहित नसल्यामुळे शासनाचे पैसे मिळाले नसते ; मात्र आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकारामुळे पैसे मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया रिक्षा चालकांमधून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!