
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या गोगवे शितकरण केंद्राच्या नवीन अद्यावत अश्या उभारलेल्या २ लाख लिटर क्षमतेच्या रेफ्रिजेशन प्लॅान्टचे उद्धाटन संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आले. तेसच वाढीव विदयुत लोडच्या ट्रान्सफॉर्मरचे व क्युबीकल मिटरींग रूमचे उद्धाटन संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक श्री.अरूण डोंगळे यांचे हस्ते कण्यात आले. प्रास्ताविक शाखा प्रमुख सुधाकर पाटील यांनी केले.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन. विश्वासराव पाटील म्हणाले सध्या चिलिंग सेंटरकडे दररोज १ लाख लिटर दूधाचे संकलन होत असुन पुढील काळात दूध संकलन दोन लाख लिटर पर्यंत वाढविणेचा मानस संचालक मंडाळाचा असलेचे प्रतिपादन यांनी व्यक्त केले. व आभर दिलीप गवळी यांनी मांडलेयावेळी चेअरमन विश्वासर पाटील माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, गोगवे शाखा प्रमुख सुनील पाटील तसेच चिलिंग सेंटर कडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply