थेट पाईपलाईन योजनेचे काम गतीने पूर्ण करा आ. चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेतील जॅकवेल सह प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचा बार चार्ट तयार करावा. कालबद्ध प्राधान्यक्रम ठरवून, योजनेचे काम गतीने पूर्ण करून, शहराला थेट पाईपलाईन योजनेतून लवकर पाणी द्यावे, अशा स्पष्ट सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी येथील जॅकवेल केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्प अधिकारी हर्षजित घाटगे, ठेकेदार जी.के.सी. प्रोजेक्टस लि.चे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी, वसंतराव नलवडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.
योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव व वन विभाग व महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेवून प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी समयबद्ध कार्यक्रम निश्चित करून, योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या. विशेषतः धरणक्षेत्रातील इन्स्पेक्शन वेल, इंटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल आदी इत्यादी कामे पूर्ण करण्याच्या कालावधीबाबत नियोजित वेळेचा बार चार्ट तयार करून, काम गतीने पूर्ण करण्याची सूचना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!