
कोल्हापूर: श्री. आर.डी.पाटील पाडळी खुर्द ता. करवीर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्याचा कार्यक्रम रद्द करून समाजात एक नवीन पायंडा पडावा म्हणून त्यांच्या दोन मुले गोकुळचे सह व्यवस्थापक बी.आर.पाटील आणि संजय पाटील(के.डी.सी.सी.बँक) यांनी त्या खर्चातून स्मशानभूमीमध्ये लागणारे आवश्यक साहित्य व दूध संस्था कर्मचारी व दूध उत्पादक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.आणि सामजिक बांधिलकी जपण्याचा नवा आदर्श निर्माण केला. सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच तानाजी पालकर व ग्रामपंचायत सदस्य व दूध संस्थेचे कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply