
कोल्हापूर : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थिती हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. राज्यातील सुमारे ७ लाख १५ हजार परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना प्रत्त्येकी रु.१५०० प्रमाणे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सध्याच्या पॅकेज नुसार फक्त परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे. रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीब जनतेचे दुख: जाणून त्यांना केलेल्या मदतीबाबत आभारी असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. रिक्षा व्यावसायिकांना शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आज सायंकाळी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथून सुरु करण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे रमेश पोवार, विष्णुपंत पोवार, सुनील खेडेकर, राजू काझी, सुभाष पाटील, विक्रम पोवार, अल्लाउद्दिन नाकाडे, अशोक माने आदी उपस्थित होते.
Leave a Reply