
कोल्हापूर :राज्यात सरासरी ५०लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे.याचा दूध संघाना आर्थिक फटका बसत आहे.मात्र गतवर्षी प्रमाणे यंदाही महाविकास आघाडीचे सरकार शिल्लक दुधाच्या पावडरसाठी लवकरच अनुदान देण्यासाठी ठोस पाऊले उचलणार आहे.शिल्लक दुधाचा आढावा घेवून याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.दुग्धविकास मंत्री सुनिल केदार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात येथे सायकांळी त्यांचे आगमन झाले. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील व रयत संघाचे संचालक सचिन पाटील यांनी मंत्री सुनिल केदार साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. व दुग्ध व्यवसायासमोर असणा-या अडी-आडचणीबाबत व संघाच्या प्रलंबित असणा-या विविध प्रस्तावांना मंजुरी मिळणेबाबत संघाच्या मागण्याचे निवेदन दिले.यावेळी गोकुळचे डेअरी व्यवस्थापक ए.वाय.चौधरी, संघाचे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदि उपस्थित होते.
Leave a Reply