
कोल्हापूर:सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी निकाल दिला आणि त्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली. त्यादिवशी पासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत आंदोलने झाली पाहिजेत. आंदोलने मोर्चे काढणे प्रत्येक नागरिकाचा किंवा समाजाचा अधिकार आहे. आज समाज नाराज आहे, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. त्यांना वास्तव परिस्थिती ची जाणीव करून देणे माझी जबाबदारी आहे. मराठा समाजाने जी ताकत दाखवायची होती ती दाखवली आहे. पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवून वेठीस धरणे योग्य होणार नाही. ज्या लोकप्रतनिधींना समाजाने मतदान देऊन निवडून दिले. आता खरी जबाबदारी त्यांची आहे. त्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणे महत्वाचे आहे. समाजाला राजकीय पक्षांच्या वाद विवादात कसलेही स्वारस्य राहिले नाही. आजही लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोण म्हणत आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे. तर कोण म्हणत राज्याची. आम्ही म्हणतोय ही जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची आहे.
त्यामुळे आम्ही आता आंदोलनाची दिशा ठरवली आहे. आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालक मंत्री सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. त्या ठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्या जागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी.प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही हे मूक आंदोलन करणार आहोत. समाज शांत असेल म्हणजेच मूक पने ऐकणार. आणि आमदार, खासदार, मंत्री फक्त बोलणार. मराठा समाजाच्या मागण्या बाबत आमदार, खासदार, मंत्री यांनी समाजाच्या समोर, समाजाच्या साक्षीने बोलले पाहिजे.म्हणून आम्ही या आंदोलनाची tag line ठरवली आहे ती पुढील प्रमाणे आहे.समाज बोलला, आम्ही बोललो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी निश्चित करा! कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे’असे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
Leave a Reply