
मुंबई :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील व नूतन संचालक मंडळाने बुधवार दि.०९ जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मानीय खासदार शरद पवारसाहेब यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह, गृहनिर्माण, परिवहन, व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व उपस्थित होते.
यावेळी दूध संघाच्या विविध विषयावर खासदार शरद पवार व संघाचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्यात चर्चा झाली.
यावेळी पवार साहेबांनी नव्या नेतृत्वाखाली गोकुळ आणखी बहरत जावो, गोकुळ अजून मला बहरलेला पहायचा आहे , त्यामुळे दूध उत्पादकांच्या उन्नती चे नवनवीन पाऊल गोकुळ ने टाकावे अशी अपेक्षा व्यक्त करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी गोकुळच्या वाटचालीचे मनापासून कौतुक केले व संघाच्या उत्कृष्ट कामकाजाबाबत गौरवउद्गार काढले.दूध संघाला मुंबई मध्ये दूध विक्री करण्याकरीता परवानगी तसेच कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील शासकीय डेअरीची जागा गोकुळ दूध संघास मिळवून दिली.या जुन्या गोष्टींना उजाळा दिला. व येथून पुढे संघास मार्गदर्शनाची गरज लागल्यास सर्वोत्परी मदत करु असे आश्वासन दिले. गोकुळच्या विविध योजना व कार्यप्रणालीची माहिती घेतल्यानंतर गोकुळने ग्रामीण भागाची आर्थिक उन्नती चांगल्या प्रकारे केलेली आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामुळे समृद्धी प्राप्त झालेली आहे. पारंपारिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. याचा राज्यातील इतरांनी आदर्श घ्यावा असेही खासदार शरद पवार यांनी नमूद केले.
यावेळी दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचीही सदीच्छा भेट घेतली.
संचालक बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर ,मुंबई शाखेचे शाखाप्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते.
Leave a Reply