
कोल्हापूर: कोल्हापूरच्या वैभवात जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन या दोन्ही स्टुडिओचे अतुलनीय योगदान आहे. चित्रपटसृष्टीचे उगमस्थान म्हणुन कोल्हापूरची विशेष नोंद घेतली जाते. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरातील या दोन्ही स्टुडिओचे अस्तित्व कायद्याच्या नियमांच्या पळवाटा काढून नामशेष करण्याच्या मागे काही मंडळी कार्यरत आहे. या दोन्ही स्टुडिओच्या जागेवर रेखांकन करणेस शासनाने मंजुरी दिली तो निर्णय तातडीने रद्द करावा आणि शालिनी स्टुडिओचे पुर्नजिवीत होणेकरिता तसेच जयप्रभा स्टुडिओचे आज आहे तसेच अस्तित्व अबाधित रहाणेकरिता आज कॅमेरा मानस्तंभ, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे सकाळी मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Leave a Reply