सीमा भागातील दूध उत्पादकाना  गोकुळचे नेहमीच सहकार्य :आम.गणेश हुक्‍केरी

 

कोल्हापूर  वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ,श्री.सरस्वती महिला ऑप क्रेडीट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ लि,मालिकावाड ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव या संस्थाचा नूतन वास्तूचे  उध्‍दाटन  समारंभ गोकुळचे चेअरमन .विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते व आमदार गणेश  हुक्केरी, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे,बाळासाहेब पाटील इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित  झाले.यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्‍केरी म्हणाले सीमा भागातील दूध उत्पादकांचे गोकुळ हे आर्थिक उन्नती स्त्रोत आहे.गोकुळने दूध उत्‍पादकांना नेहमीच सहकार्य केले आहे. सीमा भागातील म्‍हैस दूध वाढी साठी आम्‍ही प्रयत्नशील आहोत.यावेळी बोलताना श्री.पाटील म्हणाले की कर्नाटकातील चिक्‍कोडी विभागातील पहिलीच दूध संस्‍था आहे. या संस्थेचे सुरवात ४० लिटर दूध संकलनाने झाली होती. आज या संस्थेचे संकलन ५०० लिटर पर्यंत वाढवले आहे.भविष्‍यामधे संस्‍थेने जास्‍तीत जास्‍त म्‍हैस खरेदी करून म्‍हैस दूध वाढवण्‍यासाठी प्रयत्‍नशिल रहावे तसेच गोकुळच्‍या विविध योजनांचा लाभ दूध उत्‍पादकानी घावा. ज्‍या संस्थेचे विश्वस्त चांगल्या विचारांनी संस्‍थेचे कामकाज  करतात. त्या संस्था नेहमी प्रगतीपथावर आहेत. संस्थेचा हेताचा जो विचार करतो. त्यातच संस्‍थेचे व सभासदाचे  हित असते त्यासाठी काम करणारे विश्वस्त चांगले असले पाहिजेत.असे मागदर्शन केले.यावेळी आमदार गणेश  हुक्केरी, चेअरमन विश्वास पाटील, माधवराव घाटगे चेअरमन गुरुदत्त शुगर्स, बाळासाहेब पाटील, शोभा पाटील, याशोदिता पाटील, बबन चौगुले, राहुल घाटगे, श्रीपतराव जाधव, बी.आर.यादव, प्रदीप जाधव, आर.जी.डोमणे, अण्णासाहेब यादव, अजय सूर्यवंशी व संस्थेचे  अधिकारी, कर्मचारी व दुध उत्‍पादक शेतकरी व महिला उपस्थित होत्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!