पुष्कराज राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

 

कोल्हापूर : सध्याची कोरोना स्थितीमुळे गोरगरीब नागरिकांचे होत असलेले हाल पाहता सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचा वसा यावर्षीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष कु.पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्याकडून जपला गेला. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण म्हणजे वाढदिवस.. एकीकडे वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे फॅडच झाले असताना, आपल्या आनंदाचा क्षण दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, वाढदिवसाचा हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, या भावनेतून कोणताही गाजावाजा न करता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांचा २३ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांचे समाजकार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामजिक कतर्व्य समजून आज नो मर्सी ग्रुप व युवा सेनेच्या वतीने शहरातील सुमारे १०० गोरगरीब रिक्षा व्यावसायिक आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तूच्या कीटमध्ये तांदूळ, गहू, खाद्यतेल, तुरडाळ, मसुरा, साखर, चहापुड, मसाले आदी वस्तूंचा समावेश आहे.
नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना मा.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शना नुसार श्री. ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वतीने लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्याना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. या कोरोनाच्या काळातही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, नो मर्सी ग्रुपचे रोहन घोरपडे, दिग्विजय साळुंखे, करण पोतदार, रोहित मेळवंकी, ओंकार वाले, करण मिरजकर, राजअहमद सय्यद, यश काळे, विराज चव्हाण, अमेय अतिग्रे, शिवसेनेचे अरुण सावंत, रणजीत जाधव, जयवंत हारुगले, अमित चव्हाण, सुनील खोत, अजित गायकवाड, सुनील जाधव, किशोर घाटगे, अश्विन शेळके, सनी अतिग्रे, सुशील भांदिगरे, इंद्रजीत आडगुळे, राजू काझी, मंदार तपकिरे, निलेश हंकारे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, युवा सेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते, जिल्हा समन्वयक योगेश चौगले, शहर अधिकारी पियुष चव्हाण, शहर समन्वयक शैलेश साळोखे, उपशहर अधिकारी दादू शिंदे, सुनील खेडकर, रमेश पवार, बबन गवळी, किरण पाटील, यशंवत माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!