अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या कर्ज प्रक्रियेबाबत जनजागृती करावी :राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठा समाजातील युवकांना इतर माध्यमातून न्याय मिळण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना सक्षम बनविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याकरिता कर्जपुरवठा योजना प्रक्रियेत सुलभता आणून, पात्र लाभार्थ्यांना कर्जपुरवठा होण्यासाठी कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. यासह मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या दि.२७ जुलै रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्याकरिता ऑनलाईन माहिती शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खाजगी बँकाची बैठक आज शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडली.बैठकीच्या सुरवातीस बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आजपर्यंत किती उमेदवारांनी अर्ज केले, त्यातील किती लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला, त्यातील किती लाभार्थी नियमितपणे कर्ज फेडत आहेत आणि त्यातील किती लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरु आहे आदी महामंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली.यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने यांनी, वैयक्तिक कर्ज योजनेत आजतागायत सुमारे ६ हजार अर्ज प्राप्त झाले असून २५७७ लाभार्थ्यांना सुमारे २१६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला असून, त्यातील २२५३ लाभार्थ्यांना १३ कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला असल्याची माहिती दिली. यासह जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या ५५ अग्रणी व सहकारी बँका व ३७ खाजगी बँकामार्फत कर्जपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!