जय जय स्वामी समर्थ मालिकेतील भूमिकेचा अभिमान:अक्षय मुडावदकर

 

प्रतिनिधी :आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणार्‍या एका इसमाच्या हातून कुर्‍हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली… तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले… इथून खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला… अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीत, त्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले… कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पाशी, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील सध्या प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. तसेच या भूमिकेचा मला अभिमान वाटतो असे मत जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे प्रमुख भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर यांनी व्यक्त केले आहे.

सध्या ही मालीका ‘जय जय स्वामी समर्थ’ सोमवार ते शनिवार रा. ८.०० वा. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर.सुरू असून शिरीष लाटकार लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे. सध्या वेळेच्या भरधाव अश्वावर आरूढ होण्याची स्पर्धा आजच्या विज्ञान युगात अव्याहत सुरू आहे. जो तो भौतिक सुखांसाठी प्राण पणाला लावून धावतो आहे आणि परिणामी कमालीचा असुरक्षित, व्याधीग्रस्त, तणावपूर्ण आणि वैफल्यग्रस्त आयुष्य आजचा माणूस जगतो आहे. आजच्या पिढीच्या नशिबी आली आहे अफाट स्पर्धा आणि अवाजवी अपेक्षांचे ओझे… अशावेळी अत्यंत अस्वस्थ, उद्विग्न मनाला शांततेची, सकारात्मकतेची, आशेची आवश्यकता भासते… संकटकाळी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, दिशाहीन व्हायला होतं तेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन आपला तारणहार होईल या विश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तीभावाने. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवला, त्यांचे मार्गदर्शक बनले… त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशाच ब्रह्मांडनायक ‘श्री स्वामी समर्थ’ ह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला…”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” किंवा “अशक्यही शक्य करतील स्वामी” या अमृतमय शब्दांची शक्ती अद्वितीय आहे. असुरक्षित मनाला, जीवनाला आश्वस्त करणारी आणि संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देणारी ही संजीवन वचनं आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उद्याची शाश्वती नाही तिथे विशेषत: तरुण पिढीला स्वामी समर्थ आणि त्यांचे तत्वज्ञान दिशादर्शक वाटत आहे… आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही… नामस्मरण हीच पूजा आणि तोच यज्ञ हे त्यांचे सांगणे आहे. त्यांची वचने लाखो लोकांना आधार देतात… अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळाली आहे…

श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले… त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत… हिमालय, भारत – चीन सीमा, काशी, त्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले… स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्य, सुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे…
आजच्या काळात यांनी सांगितलेली तत्त्वं, त्यांचे उपदेश असाधारण शक्ती देऊन जातात… आणि हेच अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे आहे. चांगल्याचा वाईटावर विजय पाहून एक प्रकारचे बळ मिळते… आजच्या विज्ञाननिष्ठ काळात का बरं यांचे तत्वज्ञान धीर देतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आहे. तेंव्हा नक्की पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!