
कोल्हापूर: कोल्हापुरातील शल्यचिकित्सकांची संघटना म्हणजेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राजाराम तलाव परिसरात १०० हून अधिक रोपे लावण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी कोल्हापुरातील सर्जिकल सोसायटीच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण उपक्रमात देशी जातीच्या वड, पिंपळ जांभूळ इत्यादी रोपांचे रोपण करून समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला आहे. याप्रसंगी डॉ. प्रकाश शहापूरकर,संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय कस्सा, सचिव डॉ. बसवराज कडलगे,डॉ. प्रतापसिंह वरुटे,डॉ. मानसिंगराव घाटगे, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ.पी.बी. शहा, डॉ. सूनील नाडकर्णी, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. सौरभ गांधी,ऍड. सुनील धुमाळ, डॉ. संजय देशपांडे, डॉ.पेंढारकर यांच्यासह संघटनेचे सदस्य, सभासद सहभागी झाले होते.
Leave a Reply