भीमा-रिद्धी ब्रॉडबॅन्डच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ

 
गेली २० वर्षं भीमा-रिद्धी इन्फोटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच बीटीव्ही मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना केबल सेवा पुरविली जाते. काळानुसार तांत्रिक बदल स्वीकारत बीटीव्हीने ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सर्वोत्कृष्ट केबल सेवा दिली आहे. आता गेल्या दोन वर्षांपासून बी इंटरनेट सेवा सुरू केली असून आज, भीमा-रिद्धी ब्रॉडबॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. चॅनेल बी आणि बी न्यूजचे ऑफिस असलेल्या कैलास टॉवरमधील चौथ्या मजल्यावर, बी इंटरनेटचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संचालक हरिष गुलाबानी, सौ. अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, आदर्श गुलाबानी, यशोराज पाटील, माधव बेटगिरी, चारूदत्त जोशी, शेखर पाटील यांच्यासह बीटीव्हीचे तंत्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते. फायबर ऑप्टिक केबलद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात वेगवान आणि सातत्यपूर्ण इंटरनेट सेवा दिली जात असून, ५ एमबीपीएस पासून ते अगदी ३०० एमबीपीएसपर्यंत विविध पॅकेजद्वारे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट इंटरनेट पुरविले जाते. घर, ऑफिस, इंटरनेट कॅफे, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, शोरूम यांच्यासाठी बी इंटरनेटचे विविध प्लॅन असून, मागणीनुसार लीजलाईनचाही पुरवठा केला जातो. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान वापरून बी इंटरनेटने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!