
कोल्हापूर : समाजातील उपेक्षित, वंचित, दीन दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक नागरीकाने या कामात पुढाकार घ्यावा आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीतर्फे मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी आदेशाचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार जाधव म्हणाले, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्याने या लाभापासून ते वंचित राहतात. या योजनेत किती लाभार्थी आहेत, याची माहिती घेऊन, कोल्हापूर शहरातील एक ही लाभार्थी योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.
यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वितरण आमदार जाधव, समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल, समिती सदस्य चंदा बेलेकर, दिपाली शिंदे, सुनिल देसाई, रफीक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत जयदिप पाटील यांनी केले. आभार नरेंद्र पायमल यांनी मानले.
Leave a Reply