
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील श्रमिक आणि मानधन तत्वावर काम करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आज युवा पत्रकार संघाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. युवा पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्याकडून कौतुक करण्यात आले. आज धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कोरोनाची दुसरी लाट आली. कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत नाही. लॉकडाऊनमुळे लोक घरात बसले पण डॉक्टर, पत्रकार,सफाई कामगार, आशा वर्कर्स, अत्यावश्यक सेवेत काम करणारे लोक हे कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लोक सेवा करत आहेत. यात जीवावर उदार होऊन लोकांपर्यंत प्रत्येक बातमी पोहचवणारे श्रमिक पत्रकार आर्थिक संकटात सापडले आहेत. याचा विचार युवा पत्रकार संघाने केला.हा उपक्रम राबविला हे कार्य प्रशंसनीय आहे.ही संस्था भविष्यात पत्रकारांची शिखर संस्था म्हणून आपली ओळख निर्माण करेल ,असे प्रतिपादन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमात केले.कार्यक्रमास माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण ,सत्य साईबाबा सेवा संघटनेचे अध्यात्म विभागाचे प्रमुख मुरलीभैया जाजू, सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार ,ज्येष्ठ पत्रकार व संपादिका सुनंदा मोरे, नंदकिशोर जाजू,बजरंग माळी, अशोकजी सारडा, भाजपचे राजारामपुरी मंडलचे अध्यक्ष रवी मुतगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरप्रमाणे राज्यभरातील श्रमिक पत्रकारांना टप्प्या टप्प्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी केली.
आज १४० पत्रकारांना महिनाभर पुरेल इतके साहित्य देण्यात आले.या उपक्रमासाठी युवा पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाब शेख, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, रत्नदीप चव्हाण, युवा पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चना चव्हाण,राज्य उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, रतन हुलस्वार, डी.एस.कोंडेकर, बाबुराव वळवडे,महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा मार्था भोसले, शकील जमादार ,राकेश पोलादे, युवा पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार संदीप पोवार ,इम्रान मोमीन, ईजाज शेख,समीर चौधरी,जमीर चौधरी यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply