
कोल्हापूर:संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. यामुळे आमदार जाधव यांनी पूरग्रस्त भागाचा आज दौरा केला व नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने इशारा पातळी गाठली आहे. तरी तमाम कोल्हापूर शहरवासीयांना विनंती आहे, कोणताही धाडसी निर्णय अथवा कृती करू नका. कोरोना व महापूराच्या संकटाचा सामना करताना प्रशासनाला सहकार्य करा.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासून कोल्हापूर सह काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. अजून दोन दिवस पाऊस आहे. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, की पाणी वाढण्याची वाट न पाहता प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.
पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याबरोबरच त्या कुटूंबांना मूलभूत सुविधेबरोबर आरोग्य सुविधा पुरविणेबाबतच्या सुचना आपत्ती व्यवस्थापनास दिल्या.यावेळी आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे, उपायुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, शहर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, उदय फाळके, दीपक शेळके, संभाजी मांडरेकर, दिलीप पाटील यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply