
कसबा सांगाव: नैसर्गिक आपत्तीचा सर्वांनी एकजुटीने सामना करुया. पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मौजे सांगाव ( ता.कागल ) येथे राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना तात्काळ मदत म्हणून दहा किलो गहू , दहा किलो तांदूळ , पाच लिटर रॉकेल वितरित करण्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील , तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे , गटविकास अधिकारी सुशील संसारे आदी प्रमुख उपस्थित होते.
नामदार मुश्रीफ यांनी पुराचे पाणी आलेल्या अर्जुननगर याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. प्रातिनिधिक स्वरूपात पूरग्रस्तांना मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. मौजे सांगाव ८३ , कसबा सांगाव २४ पूरग्रस्त कुटुंबांना धान्य देण्यात येणार आहे. बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील , सरपंच विजयसिंह पाटील , उपसरपंच संदीप क्षीरसागर , ग्रा.प सदस्य हरी पाटील , तलाठी दीपक पाटील , ग्रामविकास अधिकारी एस.के कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply