
कोल्हापूर : श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, श्रीमती बोंद्रे यांनी त्यांचे भाऊ अनिल निकम व वहिनी सुनीता निकम यांच्याशी संगनमत करून अभिषेक बोंद्रे यांचे बेकायदेशीर व खोटे दत्तकपत्र तयार केले आहे. यासाठी अभिषेक निकम यांची खरी जन्मतारीख 4.5.1987 असताना पदाचा गैरवापर करून रमा बोंद्रे व त्यांचे भाऊ अनिल निकम यांनी संस्थेतील रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून मूळची जन्मतारीख 4.5.1989 अशी नमूद केली. याबाबतची माहिती आमच्या लक्षात आल्यानंतर त्याबाबतची फिर्याद वरील सर्वांविरुद्ध येथील मा. प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार न्यायालयाने रमा बोंद्रे, अनिल निकम व सुनीता निकम यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्सही दाखल केले आहे.
या अनुषंगे श्रीमती रमा बोंद्रे यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये. त्याचबरोबर संस्थेच्या बदनामीबद्दल एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार आहोत, असेही मानसिंग बोंद्रे यांनी सांगितले.
Leave a Reply