संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा उभारणार : आमदार चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारूया. त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया महानगरपालीकेने पूर्ण करावी व पुतळा उभारणासाठी निधी देण्याचे आश्वासन आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले.जयंतीनिमित्त केशवराव भोसले यांच्या प्रतिमेच पूजन आमदार चंद्रकांत जाधव आणि आयुक्त डाँ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

नाट्यगृह परिसरात संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा उभारावा अशी मागणी विविध कलाकारांनी केली आहे.
आमदार जाधव म्हणाले, उत्कृष्ट गायनकला आणि नाट्याभिनय या गुणांच्या आधारे मराठी रंगभूमीवर ‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे. संगीतसूर्य कोल्हापूरचा आभिमान असून, त्यांच्या स्मृती जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारून, या श्रेष्ठ कलावंताच्या स्मृती चिरंतन जपणे गरजेचे आहे.
पुतळा उभारणीसाठी त्वरित समितीची स्थापना करावी व महानगरपालिकेने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.
केशवराव भोसले यांचे पणतू अशोक पाटील यांनी आक्टोबरमध्ये केशवरावांच पुण्यस्मरण शताब्दी वर्षा आहे. या निमित्त काही भरीव कामगिरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
नाट्यपरिषदेचे आनंद कुलकर्णी यांनी केशवराव भोसले यांच्या नावानं महापालिकेनं पुरस्कार सुरु करावा.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिका कर्मचारी, कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!