
कोल्हापूर : मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने श्रावण सोमवारच्या शुभमुहूर्तावर आणखीन एक नवीन उत्पादन घेऊन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने दुग्धजन्य पदार्थामध्ये आणखीन एका नव्या रूपामध्ये म्हणजे गोकुळ बासुंदी विक्रीसाठी लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. त्याची आज दिनांक ०९.०८.२०२१ रोजी श्रावण सोमवारच्या शुभदिनी गोकुळ प्रकल्प येथे मा.चेअरमन श्री.विश्वास पाटील शुभहस्ते व इतर मान्यवर संचालक तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत लॉंचिंग झाले.सध्या बाजारामध्ये गोकुळ फूल क्रीम व गाय दूधाची विक्री कोल्हापूर,पुणे,मुंबई,सिंधुदूर्ग, रत्नागिरी,सांगली,बेळगांव,गोवा या ठिकाणी दररोज अंदाजे १३ लाख लिटर्स पर्यंत केली जात आहे. गोकुळच्या गुणवत्तेवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास असल्याने गोकुळ दूधाबरोबर गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ तूप,श्रीखंड,टेबल बटर,कुकींग बटर,पनीर,लस्सी,दही,ताक, टेट्रा पॅक दूध या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या काही काळापासून ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन संघाने “गोकुळ बासुंदी” उत्पादन घेऊन विक्रीसाठी उपलब्ध करून देणेचा निर्णय संचालक मंडळाने नुकताच घेतला होता. याची अंमलबजावणी म्हणून गोकुळच्या बासुंदीचे लॉंचिंग आज करण्यात आले. सुरवातीच्या काळात बासुंदी २५० ग्रॅम व ५०० ग्रॅम अशा आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध केली आहे तसेच अंजीर,सीताफळ, बटरस्कॉच व इतर सर्व फ्लेवर मध्ये लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार भविष्यात १ किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देणेचे नियोजन केले आहे.सध्या सणासुदीचे दिवस सुरु असलेने ग्राहकांना गोकुळच्या बासुंदीची चव निश्चितच आवडेल सदरची बासुंदी वितरकांबरोबरच मोठ्या शहरांमधील मुख्य मॉलमध्ये उपलब्ध करून देणेत येणार आहे.बासुंदी उत्पादनामुळे संघाकडे अतिरिक्त ठरणाऱ्या दूधाची काही प्रमाणात निर्गत लावणे शक्य होणार असल्याचे संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी प्रतिपादन केले आहे.
Leave a Reply