निवेदन न स्वीकारता शिष्टमंडळाचा अवमान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपच्या वतीने निषेध

 

कोल्हापूर : राज्य शासनाने परिचारीकांच्या बदल्या संदर्भा काढलेल्या अद्यादेशा बद्दल निवेदन देण्यासाठी आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाचे निवेदन न स्वीकारून आणि वृत्तछायाचित्रकाराचा कॅमेरा काढून घेण्याचे आदेश देऊन अरेरावी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकार ने काढलेल्या परिचारिकांच्या बदल्यांच्या आदेशाबाबत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पूर्वसूचना देऊन व वेळ घेऊन  शिष्टमंडळ गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या  दालनामध्ये भाजपा शिष्टमंडळ पोचताच जिल्हाधिकाऱ्यांनी  केवळ पाच कार्यकत्यांनी थांबा तरच निवेदन स्वीकारणार अशी भूमिका घेतली. त्याचबरोबर फोटो घ्यायचे नाहीत असे म्हणत शिष्ट मंडळासोबत आलेल्या वृत्त छायाचित्रकारांचा कॅमेरा जप्त करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला. सदर घटनेचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता अचानक अरेरावीवर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले. तसेच शिष्टमंडळाने अन्य पक्षसंघटनाशासकीय मिटिंग यामध्ये आपल्या दालनात गर्दी चालते तर विरोधी पक्ष म्हणून समाजाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी आलो असता आम्हाला वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित केला. शिष्टमंडळाने जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांचा निषेध नोंदवला. “ दबावाखाली काम करणा-या जिल्हाधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, “निवेदन न स्विकारणा-या जिल्हाधिकाऱ्यांचा धिक्कार असो” “लोकशाहीचा गळा घोटणा-या जिल्हाधिकाऱ्यांचा धिक्कार असो” “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला धक्का देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा धिक्कार असो”  अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर शिष्टमंडळाच्या आक्रमक भुमिकेवर शिष्टमंडळाचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेर निवेदन स्वीकारू अशी भूमिका घेतली. जिल्हाधिकारी दालना बाहेर निवेदन स्विकारण्यासाठी आल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव निवेदनाचा विषय मांडत असताना पुन्हा सोशल डीस्टनसिंग अनाठायी आग्रह जिल्हाधिकारी धरू लागले. यावर भाजपा पदाधिकारी पुन्हा आक्रमक होऊन जिल्हा पदाधिकारी व प्रेस यांना प्रवेश दिल्याशिवाय निवेदन देणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी पुन्हा निवेदन न स्वीकारता दालनामध्ये निघून गेले. यानंतर भाजपा शिष्टमंडळाने सदरचे निवेदन जिल्हाधिकारी दालनाला चिकटवून पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.सदर घटनेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव म्हणाले” आज भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने परिचारकांच्या बदल्या विषयात निवेदन देण्यात येत होते. परंतु निवेदन स्विकारताना फक्त पाच लोक उपस्थित रहावेत अशी भूमिका घेत निवेदन स्विकारण्यास असमर्थता दर्शवली. जिल्हाधिकारी दालनात निवेदन न स्वीकारून त्यांनी शिष्टमंडळाचा अपमान केला आहे. लोकशाहीला गळा घोटण्याचे कार्य जिल्हाधिकारी करत आहेत. वृत्त पत्र छायाचित्रकाराचा कॅमेरा जप्त करण्याच्या सूचना देत आहेत. इतर पक्षाचे निवेदनमिटिंगफोटोग्राफी यांना कशी चालते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशी हुकुमशाही कोणी करायला सांगितली असा सवाल उपस्थित केला. त्यांची हि वृत्ती निषेधार्थ असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले “आजची जिल्हाधिकारी यांची निवेदन न स्वीकारण्याची बाब चुकीची असून आज पर्यंत असे पहिले जिल्हाधिकारी पाहिलेत कि हे कोणाच्या तरी दबावाखाल काम करताना दिसत आहेत. निवेदन स्विकारण्या ऐवजी किती लोक आलात याविषयावरच ते ताठर राहिले. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. ते अशा पद्धतीने वागले याबद्दल अशा जिल्हाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करतो. विरोधी पक्षाला अशा पद्धतीची चुकीची वागणून का लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या पत्रकारांना देखील त्यांनी चुकीच्या पद्धीतीने वागणूक दिली. तीन तीघाडी सरकारने शेतकरीव्यापारीसर्व सामान्य नागरिकांची वाट लावली असताना हे जिल्हाधिकारी लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम सोडून फक्त पद भूषवायलारुबाब करायला कोल्हापूर मध्ये आलेत काय असा सवाल आहे.” पुरोगामी शाहू नगरीत जिल्हाधिकारी यांचे असभ्य वर्तन येथील स्वाभिमानी जनतेला न पटणारे आहे. या घटनेचा आम्ही निषेध करत असून यापुढे देखील त्यांचे असेच वर्तन राहिल्यास जिल्हाधिकारी यांच्या विरोधात लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!