
कोल्हापूर: कोल्हापुरातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी दिल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत हातकणंगले तालुक्यातील रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली.पूरबाधितांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून सध्या प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामेगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. यानंतर पूरबाधितांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी बैठक घेऊन ठोस उपाययोजनांबाबत चर्चा करुन कृती आराखडा तयार केला जाईल. यात या भेटीवेळी ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार केला जाईल.
रुई-इंगळी बंधाऱ्याबरोबरच नदी, ओढ्यावरील भरावामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजना करणे, ओढ्यावरील व नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, गाळ व राडारोडा काढणे, गावांचे पुनर्वसन करणे, पुररेषा निश्चित करुन नद्यांचे रुंदीकरण आदी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे.यावेळी, माजी खा. निवेदिता माने, आ. राजूबाबा आवळे, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, माजी आ. राजीव आवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जि.प. सदस्य स्मिता शेंडोरे, हातकणंगले तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान जाधव, पं.स. सदस्य आजीम मुजावर, पं.स. सदस्य महेश पाटील, अरुण माळी, रुई सरपंच करिष्मा मुजावर, इंगळी सरपंच शालन पाटील, बापूसाहेब आवटे, बाबुराव बेनाडे, संजय मगदूम, रावसाहेब मरचुरे, अक्षय मगदूम, बाळासाहेब पाटील, किरण भोसले, अण्णा रामाण्णा, सुनील वडगावे, गणेश वाईंगडे, अविनाश शिंदे, सुधीर भोकरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply