डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या याचिकेवर त्वरित कार्यवाही अहवाल देण्याचे आदेश

 

कोल्हापूर:आरोपींना अटक आणि पीडित मुलीची सुटका गरजेची
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे  बालिका अत्याचार/अपहरण प्रकरणात डॉ जगन्नाथ पाटील यांच्या याचिकेवर कोल्हापूर जिल्हा अधीक्षक आणि बेंगलोर पोलीस कमिशनर यांना त्वरित कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना अटक आणि पीडित मुलीची सुटका गरजेची असताना अद्यापही कार्यवाही न झाल्याची नोंद आयोगाने घेतली आहे. यावेळी आयोगाने कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समितीच्या या संदर्भातील निर्णयाची दखल घेतली आहे.  यासंदर्भातील फिर्यादीनुसार डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या मुलीचे (आशियाना वय सात वर्षे) स्वतःच्या आईनेच गुंडांच्या मदतीने बेंगलोर येथून अपहरण केले आहे. आणि आरोपी अकरा दिवस फरार आहेत .वृद्ध आजी आणि केअरटेकर शिक्षिका तसेच स्वतः ची मुलगी यांना  मारझोड झाल्याचे चित्रीकरण उपलब्ध असून पोलिसात गुन्हे नोंद झाले आहेत .दोन राज्याच्या पोलिसांचे वॉरंट ,कोर्टाची नोटीस, बालकल्याण न्यायालयाचे आदेश याला न जुमानता 11 दिवस मुलगी अज्ञातस्थळी दडवून गुन्हेगार बसले आहेत. 16/08/2021 रोजी डॉ. जगन्नाथ पाटील यांची तक्रार/सूचना 17/08/2021 रोजी आयोगासमोर ठेवण्यात आली. त्याचा विचार करून आयोगाने पुढीलप्रमाणे  निर्देश दिले. या प्रकरणातील आरोप असा आहे की,  त्यांच्या अल्पवयीन मुलीचे  स्वतःची पत्नी, पत्नीची बहिण आणि इतर अज्ञात सहकारी  यांच्या सहाय्याने बळजबरीने  अपहरण केले आहे. 6.8.2021 रोजी त्यांच्या बेंगलोर येथील  निवासस्थानावरून त्यांच्या  आईला आणि मुलीच्या काळजीवाहू शिक्षिकेला मारहाण करून मुलीच्या इच्छेविरुद्ध हे अपहरण करण्यात आले.  पुढे आरोप आहे की, पीडित मुलीला  तिच्या इच्छेविरोधात नेले गेले आहे आणि ही बाब त्यांच्या शेजारच्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या घटनेच्या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. त्यांच्या पत्नीच्या या गुन्हेगारी कृत्याविरोधात, त्यांनी केंगेरी पोलीस स्टेशन, बेंगलोर  येथे तक्रार दिली होती.  त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 506,341,34,504,448,223 अंतर्गत त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नाही कारण ते  आरोपी फरार आहेत.  त्यापैकी काही  आरोपी हे कोल्हापूर जिल्ह्यातच पीडित मुलीसह  लपले आहेत.  या तक्रारीवर बालकल्याण समिती कोल्हापूर यांनी  दिनांक 11.8.2021 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे कोल्हापूर आणि राधानगरी पोलीस अधिकाऱ्यांना मुलीचा तत्काळ शोध घेण्याचे आणि तिला समितीसमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  आरोपींनी मुलीसोबत केलेल्या क्रूर कृत्यामुळे बाल हक्कांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट  दिसत  आहे. अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तिची सुटका करणे आणि आरोपींना अटक करणे यासाठी पोलीस प्रशासन तातडीचे प्रयत्न गरजेचे आहेत. तक्रारदाराने या प्रकरणामध्ये मानवी हक्क आयोगाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्या नुसार हा सर्व मोठ्या खंडणीसाठी रचलेला नियोजित गुन्हेगारी कट आहे.कौटुंबिक वादात घरची माणसं अपहरण करून फरारी होत नसतात. बाल न्यायालयाचे मुलीला तात्काळ हजर करण्याचे जिल्हा पोलिसांना आदेश असून* देखील कोल्हापूर पोलिसांना बारा दिवस जिल्ह्यातच असलेली मुलगी शोधता आलेली नाही.या तक्रारीचा विचार करून आयोगाने दिनांक १७/०८/२०२१ रोजी कोल्हापूर जिल्हा अधिक्षक आणि बेंगलोर पोलीस कमिशनर यांना पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने  असे म्हंटले आहे की, ‘डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या याचिकेची दखल घेऊन बेंगलोर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार सौ. पाटील आणि अन्य आरोपी यांना अटक करण्याची कार्यवाही का झाली नाही, तसेच जिल्हा बालकल्याण समिती कोल्हापूर यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी आदेश असताना देखील कुमारी आशियाना हिला न्यायालयासमोर, समितीसमोर सुटका करून हजर केलेले नाही याची गंभीर नोंद घेतलेली आहे. याबाबतची कार्यवाही म्हणजेच, फरारी आरोपींना अटक करणे आणि संकटात असलेल्या, त्रस्त असलेल्या व बळजबरीने बेंगलोर येथून अपहरण करून आणलेल्या सात वर्षाच्या चिमुरड्या आशियाना या मुलीला ताबडतोब सुटका करून समितीसमोर हजर करण्यासाठी कोणती कार्यवाही केली याचा सात दिवसांमध्ये अहवाल देण्याचे’ आदेश कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक आणि बेंगलोरचे पोलीस कमिशनर यांना केलेले आहेत.‘कु. आशियाना हिला घेऊन जात असतानाची चित्रफित पाहिली असता बाल न्याय काळजी व संरक्षण २०१५ कलम ७५ प्रमाणे घटना घडलेली स्पष्ट दिसते. बालकांच्या संदर्भातील तरतुदीनुसार बालकांची सुरक्षितता महत्वाची असते. प्रस्तुत प्रकरणात कु. आशियाना हिजला घेऊन जाणाऱ्या लोकांपैकी एक व्यक्ती एक जन्मदात्री आई असतानाही मुलीच्या मनाचा तिने विचार केलेला नाही हे स्पष्टपणे दिसते. कु. आशियाना हिजला तिच्या राहत्या ठिकाणातील काळजीवाहिका शिक्षिकेच्या ताब्यातून ज्या पद्धतीने चेहरा न दिसणाऱ्या पुरुषाने ज्या दांडगावा व बळजबरीने नेले ही गोष्ट बाल कायद्यातील तरतुदीच्या विरोधात आहे.’ विशेष बाल पोलीस पथक, पोलीस अधिक्षक कार्यालय, कोल्हापूर यांनी व पोलीस निरीक्षक राधानगरी पोलीस ठाणे यांनी समन्वय साधून कु. आशियाना हिचा ठावठिकाणा शोधून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बालिकेस बाल कल्याण समिती, कोल्हापूर यांचे समोर हजर करणे गरजेचे आहे. तरी पोलीस अधिकारी यांना आदेशित करण्यात येते की, सदरहू बालिका कु. आशियाना जगन्नाथ पाटील व.व. ०७ हिस बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०२१ कलम ७५ नुसार योग्य ती कार्यवाही करावी व याबाबतचा अहवाल बाल कल्याण समिती, कोल्हापूर यांना सादर करावा. सौ. प्रगती पाटील या वेगवेगळ्या पत्त्यांवर जाऊन देखील समन्स स्वीकारत नसून व हजर नसून वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या नावाने अंतिम समन्स जाहीर केलेला आहे. त्यातून त्यांनी कोर्टामध्ये तत्काळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सौ. पाटील १ सप्टेंबर २०२१ पर्यंत  कोर्टात हजर न झाल्यास एकतर्फी निर्णय दिला जाईल असेही या आदेशामध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने नमूद केले आहे.दि. १८/०८/२०२१ रोजी बालकल्याण समितीने डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या अर्जाची नोंद घेत सौ. प्रगती पाटील या कोल्हापूरमध्ये पत्रकार बैठक घेण्यासाठी उपस्थित असताना बालकल्याण समितीसमोर हजर होत नाहीत. आणि पोलिसांना सापडत नाहीत. या बाबींची गंभीर नोंद घेतली. पुन्हा एकदा राष्ट्रीय मानव हक्क आयोग यांच्या आज्ञेचे पालन करून कोल्हापूर पोलिसांनी कु. आशियाना हिला सौ. प्रगती पाटील यांचे समवेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!