
कोल्हापूर : हिंदुत्वाच्या विचाराचा कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वेळोवेळी कसबा बावडा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असून, गेल्या बारा वर्षात विविध विकास कामांच्या माध्यमातून कसबा बावडा परिसराच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच्या महापुराच्या आठवणी ताज्या असताना पुन्हा यावर्षी महापुराने कहर केला. याचा फटका कसबा बावड्यातील हजारो कुटुंबाना बसला असून, मदत नाही तर कर्तव्य या भावनेतून कसबा बावड्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कसबा बावडा परिसरात शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य मदतीच्या वाटपास सुरवात करण्यात आली.
सकाळी कसबा बावडा येथील शिवनेरी, शिवसेना विभागीय कार्यालय येथून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १०० कुटुंबाना शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले. या आठवड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कसबा बावड्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना घरोघरी या शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सामाजिक काम करत नाही. निवडणुकीत कमी मते पडली म्हणून त्या भागाकडे दुर्लक्ष करायचे हि शिकवण शिवसेनाप्रमुखांची नाही. त्यामुळे गेल्या दोन वेळच्या आमदारकीच्या काळाप्रमाणे या दोन वर्षातही कसबा बावडावासियांशी आपले नाते अतूट आहे. मुळातच हिंदुत्वावादी विचार कसबा बावडा वासीयांच्या मनात रुजले गेले असल्याने कसबा बावडावासीयांच्या मनात शिवसेनेने स्थान निर्माण केले आहे. कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून, कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता रु. १७ कोटी इतका निधी मंजूर केला आहे. राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोड करिता रु. २५ लाख, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यांमधील रस्त्याची कामे, पाणद्यांचा विकास आदि कामांसाठी आजतागायत रु. २.०० कोटींच्या वर निधी वितरीत केला आहे. कसबा बावडा स्मशानभूमीची सुधारणा, पाणंद्यांचा विकास, विविध ठिकाणी ओपन जिम, खेळणी, हायमास्ट लँम्प आदी विकास कामे करण्यात आली आहेत.
Leave a Reply