भुदरगड तालुक्यातील शेणगाव इथल्या पूरग्रस्तांना महाडिक परिवाराचा मदतीचा हात

 
कोल्हापूर: जिल्ह्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवली की संकटग्रस्तांच्या मदतीला सर्वप्रथम महाडिक कुटुंबीय धावून जाते. हीच परंपरा कायम राखत, कृष्णराज महाडिक यांनी शेणगावमधील पुरग्रस्तांना मदत रूपाने मोठा दिलासा दिलाय. शेणगाववासिय ही मदत कधीच विसरणार नाहीत, असे उद्गार देवराज बारदेस्कर यांनी काढले.  भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे पूरग्रस्तांना मदत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. पुरामुळं बाधीत झालेल्या शेणगाव वासियांना, घरांच्या पुर्नबांधणीसाठी कृष्णराज महाडिक यांच्याकडून तब्बल ८०० पोती सिमेंट देण्यात आले.
भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे महापुराचा फटका अनेक कुटुंबांना बसला आहे. काही घरांची पडझड झाली. तर काही घरांचे मोठे नुकसान झाले. बेघर झालेल्या या कुटुंबांना घर बांधणीसाठी युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी मदतीचा उपक्रम राबवला. महाडिक यांच्याकडून पुरबाधीतांना तब्बल ८०० सिमेंटच्या पोत्यांचे वितरण करण्यात आले. कोणत्याही प्रकारची आपत्ती आली की मदतीला धावून जाण्याची महाडिक कुटुंबाची परंपरा आहे. शेणगाव सह भुदरगड तालुक्यातील १३ गावातील पुरग्रस्तांना घरे दुरूस्तीसाठी सिमेंट पोती देण्यात आली असून, लवकरच या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्यही देणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. तर माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा कृष्णराज महाडिक यांनी जपला आहे. शेणगाव ग्रामस्थांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावलेल्या महाडिक यांच्या दातृत्वाला शेणगाव ग्रामस्थ कधीच विसरणार नाहीत, असे देवराज बारदेस्कर यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वात प्रथम महाडिकांनीच मदत केल्याची भावना व्यक्त करत अनेक पूरग्रस्त महिलांनी महाडिक कुटुंबियांचे आभार मानले. यावेळी मानसिंग तोरसे, राजेंद्र शिंदे, सुनील कोरे, शुभम वायचळ, ओंकार विभूते यांचेसह धनंजय महाडिक युवाशक्तीचे विजयबाबा महाडिक, नंदकुमार शिंदे, शक्तिजीत पोवार, पार्थ सावंत, तुकाराम देसाई, प्रविण आरडे, किरण खेडकर, विनोद जाधव, पांडुरंग गुरव, धनाजी देसाई, शशिकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!