
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अज्ञानावर केलेल्या वक्तव्याबाबत आज नाट्यमयरीत्या हुकुमशाही पद्धतीने जेवणाच्या तटावरून उठवून अटक करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार नेत्याला एका वक्तव्यामुळे झालेल्या या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक येथे जोरदार निदर्शने करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक येथे एकत्र येत या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “महाविकास आघाडी सरकारच करायचं काय…खाली डोक वर पाय”, “तालिबानी प्रवृत्तीने वागणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो” “ठाकरे सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी हुकुमशाही पद्धतीचा धिक्कार करण्यासाठी आज आपण एकत्र आल्याचे सांगितले. सरचिटणीस विजय जाधव म्हणाले,”विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्याची दुर्देवी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या अन्य नेत्यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याबाबत अफजल खानाची सेना, तुडवून मारु अशा पद्धतीची भाषा वापरली. दुसऱ्याकडून आपण अपेक्षा करत असाल तर पहिले आपण पहिल्यांदा चांगले बोला. नारायण राणे यांची अटक हि सूड बुद्धीने करण्यात आली असून या तालिबानी सरकारचा निषेध करतो.”भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर म्हणाले, “राणे यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे. कोणत्याही व्यक्तीस ताबडतोब अटक करू नये नाही असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना राणे साहेबांच्या एका वक्तव्यावर राजकीय सूडबुद्धीने मोठ्या यंत्रणा वापरून पोलीस बंदोबस्तात त्यांना जेवणाच्या तटावरून अटक केली. असे कृत्य करणाऱ्या सरकारला तालिबानी सरकार का संबोधू नये?”
संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, “नारायण राणे यांना झालेली अटक निषेधार्थ आहे.
शार्जील उस्मानी सारख्या वृत्तीला तुम्ही अभय देत असाल तर एका केंद्रीय मंत्र्याला बेकायदेशीर अटक करणे ही कोणती संस्कृती ?” त्याचबरोबर नाशीकचे पोलीस आयुक्त कोणत्या व कोणाच्या आदेशाचे पालन करत आहेत असा सवाल उपस्थित केला.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, “लोकशाहीच्या दुष्टीने आजचा दिवस निंदनीय म्हणावा लागेल. दिवसभर घरात बसून असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल अभ्यास करून वक्तव्य करणे अपेक्षित आहे.
अभद्र युतीचे सरकार गेल्या दीड वर्षात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे. कोरोनामुळे या बिघाडी सरकार मधील मंत्र्यांची अनेक चुका झाकल्या गेल्या आहेत आणि त्यावर नीटपणे मत माडनाऱ्या व्यक्ती, नेत्यांवर हे तालिबानी सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. देशाचे पंतप्रधान, भाजपा नेते, राज्यपाल, गृहमंत्री यांच्यावर केलेले वक्तव्य चालतात पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली रुचत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता या तीघाडी सरकारचा तालिबानी कारभार प्रत्यक्ष अनुभवत असून आगामी काळात त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.”
याप्रसंगी भाजपा सरचिटणीस गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, मारुती भागोजी, सचिन तोडकर, अजित सूर्यवंशी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजय खाडे-पाटील, आशिष कपडेकर, डॉ.राजवर्धन, सुधीर देसाई, विवेक कुलकर्णी, भरत काळे, वल्लभ देसाई, विवेक वोरा, हर्षद कुंभोजकर, गिरीष साळोखे, सुनील पाटील, अप्पा लाड, सुधीर खराडे, गणेश चिले, भैया शेटके, दिलीप बोंद्रे, विवेक राजवर्धन, संदीप पाटील, विशाल शिराळकर, गौरव सातपुते, सुशांत पाटील, निरंजन घाटगे, महेश यादव, प्रवीणचंद्र शिंदे, प्रसाद नरुले, शिरीष मोरे, सुजाता पाटील, ओंकार खराडे, अमर साठे, रहीम सनदी, प्रीतम यादव, सचिन मुधाळे, सचिन सुराणा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply