महिला सबलीकरणासाठी मानिनी फाउंडेशन कार्यरत राहील : डॉ.भारती चव्हाण

 

कोल्हापूर : दोन वर्षाच्या प्रतिकूल अनुभवानंतर कोरोना हे संकट नव्हे तर संधी म्हणून त्यावर मात करण्यासाठी आणि समस्त महिलांच्या सबलीकरणासाठी आगामी काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बरोबरीने मानिनी फाउंडेशन कार्यरत राहील अशी ग्वाही मानिनीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ .भारती चव्हाण त्यांनी दिली . सामाजिक कार्यकर्ते स्नेहमेळाव्यात त्यांनी हे मनोगत व्यक्त केले .यावेळी सर्वांना मास्क चे मानिनी फौडेशन वतीने वाटप करण्यात आले. प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना राजेंद्र मकोटे यांनी ‘आगामी काळात अत्यावश्यक असलेल्या समुपदेशनासाठी उपजत कला असणाऱ्या महिला या अधिक प्रभावी काम करू शकतात मालिनी फाउंडेशनने माध्यम विश्वासमावेत यासाठी संयुक्त कार्यक्रम घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली . यासह हृदयस्पर्श सांस्कृतिक मंच चे पद्माकर कापसे यांनी ‘ महानगरापासून ते दुर्गम ग्रामीण भागापर्यंत कार्यरत असणाऱ्या मानिनी ने कोल्हापुरातील बारा तालुक्यात आपला चौफेर कार्य विस्तार करावा आपला ही त्यामध्ये संस्थात्मक सक्रीय सहभाग राहील असे अभिवचन दिले . महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणे यासह त्यांना आर्थिक स्थिरता देणेच्या तिहेरी पैलूने आगामी काळात कृषी पासून सर्व उत्पादने महानगरातील अंतिम ग्राहकापर्यंत अंतिम ग्राहकाच्या हातात नारी ते नारी पर्यंत पोहचण्याचा सात्विक मानिनी ब्रँडचा लवकरच कोल्हापूर मधून करणार आहोत त्यास आणि आपले ही योगदान द्यावे अशी साद घातली. सर्वांचे आभार मानताना कोल्हापूर विभाग प्रमुख श्रेयश भगवान यांनी आगामी काळात जनप्रवास दैनिक आणि जलप्रवास लाईव्ह या दोन्ही सह कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यम विश्वात अग्रेसरपणे कार्यरत राहण्याला निर्धार व्यक्त केला . या नियोजन बध्यपणे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये माध्यम प्रतिनिधी संपत नरके , सुनील ठाणेकर , प्रथमेश तांबे , महेश कांबळे , सागर ठाणेकर,सर्वेश उरणकर ,अशिष गवळी , महाराष्ट्र मिडिया च्या माहेश्वरी घोरपडे, श्रध्दा जोगळेकर ,शुभांगी तावरे ,मालोजी केरकर , श्रेयस चव्हाण ,अक्षय थोरवत , वृत्तपत्र वितरक संघटनेचे रणजित आयरेकर सह मानिनी जिल्हा अध्यक्षा स्वाती शहा, संचालिका सुमन ढेरे , सविता रायकर , स्मिता गिरी , संगिता साळोखे, सुप्रिया फाळके , स्वप्नाली देशमुख , पूनम हवलदार आदिची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!