देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच जीवनात यशस्वी:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

 

पिराचीवाडी:मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने असतात. देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच सामाजिक आणि राजकीय जीवनात यशस्वी होत आलो आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंदिराच्या बांधकामाला निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले.पिराचीवाडी ता. कागल येथे श्री. हनुमान मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मुश्रीफ बोलत होते.जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात लोकनियुक्त सरपंच सुभाष भोसले यांनी दुर्गम व कोरडवाहू असलेल्या पिराचीवाडी गावाचा चेहरामोहरा बदलून सर्वांगसुंदर गाव तयार केले आहे.येथील ऐतिहासिक तलाव व बुरुजाच्या परिसरात श्री. हनुमान देवालय साकारले आहे. श्री.  मुश्रीफ यांचा २० लाख निधीतून मंदिर व लोकवर्गणीतून कळस उभारला आहे. मान्यवर, ग्रामस्थ, भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाच्या गजरात ‘राम- लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की’ या निनादात गावातील मुख्य रस्त्यावरून दिंडीही निघाली. दिवसभरात दिंडी पूजन, श्री.  हनुमंताच्या मूर्तीचे आगमन, होम -हवनासह कलशारोहन, सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन  पट्टणकोडोलीच्या रामलिंग भजनी मंडळाच चे भजन असे आधी कार्यक्रम झाले.
        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!