बायपासला पर्यायी शॉकव्हेव लिथोट्रिप्सी हे नवीन तंत्रज्ञान डायमंड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

 

कोल्हापूर: बायपासमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर येणारा थकवा किंवा रुग्ण बरे व्हायला लागणारा कालावधी याची तुलना करता शॉकव्हेव लिथोट्रिप्सी तंत्रज्ञान ही सोपी आणि वयस्कर रुग्णांना दिलासा देणारी पद्धत आहे,असे हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना आणि डॉ. साई प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे नवीन तंत्रज्ञान डायमंड हॉस्पिटलमध्ये सुरू झाले असून डॉक्टर अक्षय बाफना यांनी 61 वर्षीय पहिल्याच रुग्णावर ही उपचार पद्धती यशस्वीपणे वापरली आहे. सत्तरी उलटलेल्या रुग्णांना याचा जास्त लाभ घेता येऊ शकतो.
देशा दरवर्षी पाच लाखाहून अधिक रुग्णांची अँजिओप्लास्टी केली जाते. त्यापैकी 70 वर्षावरील 90 टक्के पुरुष आणि 67 टक्के स्त्रियांचा समावेश आहे. रुग्णांच्या कोरोनरी आर्टरीमध्ये जो ब्लॉकेज आढळतो तो कॅल्शियमचा असतो. आत्तापर्यंत या ब्लॉक्समध्ये स्टेनिंग करणं खूप कठीण होतं. आणि रुग्णावर फक्त बायपास शस्त्रक्रिया करावी लागत होती. पण या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बायपास शस्त्रक्रियेचा सामना करण्याची क्षमता नसलेले रुग्ण सहजपणे अँजिओप्लास्टी करू शकतात. यामध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.सामान्यतः एन्जोप्लास्टी करताना फुगवलेला फुग्याच्या साहाय्याने अडथळे असलेली धमनी खुली केली जाते. जेणेकरून हृदयाला जाणारा रक्तप्रवाह पूर्ववत होतो. त्यानंतर अडथळा असलेल्या जागेत स्टेंट बसवण्यात येते. ज्यामुळे धमनी खुली राहते. परंतु रुग्णाचे वय जास्त असल्याने तसेच रुग्णाला मधुमेहासारख्या आजार असेल तर धमन्यांमध्ये निर्माण झालेले कडक व कॅल्शियमयुक्त अडथळे हे एक मोठे आव्हान असते. या अडथळ्यांमुळे बलून थेरेपी करणे कठीण होते. मग अशाबाबतीत बायपास हा एकमेव पर्याय राहतो. पण वयस्कर रुग्णांच्या बाबतीत बायपास अतिशय त्रासदायक वाटत असते. रुग्णाला याची भीती वाटत असते.
ध्वनीवर आधारित तंत्रज्ञान असलेल्या शॉक व्हेव लिथोट्रिप्सी या नवीन तंत्रज्ञानात धमन्यांमध्ये एक विशेष फुगा ठेवला जातो. आणि त्यानंतर डॉक्टरांच्या नियंत्रणात असलेल्या कंसोल या उपकरणाद्वारे उत्सर्जित केले जातात.कडक झालेला अडथळा त्यामुळे तुटतो. आणि त्यानंतर नेहमीची एन्जोप्लास्टी प्रक्रियेद्वारे स्टेंट बसवण्यात येतात. ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित असून बायपासपेक्षा हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे, असेही तज्ञ डॉ. साईप्रसाद आणि डॉ.अक्षय बाफना यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!