
मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मुंबईत येथेल वाढत्या विक्री च्या अनुषंगाने वाशी शाखेच्या शेजारील 6 लाख क्षमतेच्या स्वःता च्या नवीन जागेत नवीन पॅकींग सेंटर व स्टोअरेज उभारणार आहे. आज या जागेचा खरेदी दस्तावेज व भूमिपूजन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले यांच्या उपस्थित मुंबई (वाशी) येथे पार पडले.यावेळी बोलताना मा. चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की मुंबई वाशी येथील दुग्धशाळेची पॅकींग क्षमता अपूरी पडत असल्याने बाहेरील संस्था/कंपनी यांचेकडून आवश्याकते प्रमाणे दूधाचे पॅकींग करून घेण्यात येतं. यासाठी शाखेत होणा-या दूधाच्या पॅकींग खर्चापेक्षा जादा खर्च येत असून अनेक ठिकाणी पॅकींग करून घेण्यात येत असल्याने कामकाजावर नियंत्रण ठेवण्यामध्ये अडचणी येत आहेत. याबाबी विचारात घेऊन वाशी नवी मुंबर्इ दुग्धशाळेच्या जवळपास संघाची स्वतःची पॅकींग यंत्रणा उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून ती खरेदी करण्याबाबत संचालक मंडळाच्या मिटींग मध्ये चर्चा करून सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला की स्वःता चे पॅकींग सेंटर उभा करू. त्यानुसार मे.दालचा फुड प्रोसेसिंग प्रा.लि यांची जागा संघाच्या वाशी दुग्धशाळेस लागून आहे. त्यामुळे संघासाठी सदर जागा सोईची आहे. संघाचे सध्याचे पॅकींग युनिट व नवीन प्रस्तावित कोल्ड स्टोअरेज असे मिळून ११ ते १२ लाख प्रतिदिन दूधाचे पॅकींग व वितरण करता येईल त्यामुळे सध्या बाहेरून पॅकींग करून घेण्यासाठी द्यावा लागणारा जादा दर, टॅक्स व व्यवस्थापन खर्च इत्यादीसाठी होणारा खर्च कमी करता येईल. पर्यायाने कामकाजाचे नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी जादा अधिकारी कर्मचारी यांची आवशक्यता लागणार नाही. संघाच्या जडणघडणेमध्ये स्व. आनंदराव पाटील –चुयेकर यांनी १९९६ साली मुंबई येथे पहिल्यांदा जागा खरेदी केली होती तेव्हा त्यांच्या बरोबर होतो. तसेच आज संघाला २०२१ मध्ये नवीन जागा खरेदी करीत असताना संघाचा चेअरमन म्हणुन हे काम करीत असताना मला आनंद होत आहे. तसेच यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील व संघाचे सर्व संचालक मंडळ यांच्या तसेच दूध उत्पादक यांच्या पाटबळा मुळेच शक्य झाले आहे. असे श्री पाटील यांनी माहिती दिली.यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे,संचालक शशिकांत पाटील चुयेकर,बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील, रामकृष्ण पाटील, पुथ्वीराज पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply