‘अरुण नरके फौंडेशन’ने विकसित केली ‘इंटरनेटविना ई-लर्निंग प्रणाली’,घरबसल्या एमपीएससी-बँकिगची तयारी

 

कोल्हापूर: ररराज्यातील प्रमुख आणि नामवंत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात अरुण नरके फौंडेशनचे नाव घेतले जाते. या प्रशिक्षण केंद्रातून सामान्य शेतकरी कुटुंबातील, शहरी व ग्रामीण भागातील ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले ध्येय साकारले आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या अद्यावत सुविधा आणि तज्ञांचे मार्गदर्शन संस्थेच्या वतीने अगदी शालेय स्तरापासून दिले जाते.
आजपर्यंत नियमित ऑफलाईन पद्धतीने आणि कोविड काळात ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून कोर्सेस चालू होते. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी शहरात येताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शैक्षणिक शुल्क, राहण्यासाठी जागेचा प्रश्न, चांगले जेवण देणाऱ्या मेस आणि इतर अनुषंगिक खर्च या गोष्टी सामान्य कुटुंबातील सर्वच विध्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्‍या परवडणाऱ्या नसतात. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणात चांगल्या पद्धतीची मोबाईल व इतर उपकरणांची उपलब्धता, दुर्गम भागात इंटरनेट सुविधा मिळण्यात येणारे अडथळे, दर महिन्याला रिचार्ज चा खर्च त्यामुळे यालादेखील मर्यादा पडत आहेत. यामुळे विध्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
याशिवाय महिला गृहिणी आणि नोकरदार वर्गाला त्यांच्या दैनंदिन कामातून वेळेत क्लासेस मध्ये उपस्थित रहाणे शक्य होत नाही. या सर्वच विचार करून स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्यांसाठी संस्थेने नियमित ऑफलाईन आणि ऑनलाईन इंटरनेट कोर्सेस सोबतच इंटरनेट विना ई–लर्निग प्रणाली विकसित करून जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा कोर्सेसचा लाभ घेता यावा यासाठी सद्याची ई–लर्निग प्रणाली मोबाईल SD-Card(मेमरी कार्ड) मध्ये विकसित करण्यात आली आहे, यामुळे विद्यार्थांना आता कधीही, कुठेही , केव्हाही इंटरनेटशिवाय घरबसल्या स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करण सोप जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी ,महिला , गृहिणी व नोकरदार विद्यार्थांना आता घरापासून दूर शहरात जाऊन रूमभाडे, मेसच्या जेवणाचे तसेच प्रवासाचे आर्थिक टेन्शन कमी होणार आहे, सध्याच्या या काळात घरी सुरक्षित राहून इंटरनेटशिवाय स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करण्याची संधी अरुण नरके फौंडेशनच्या माध्यमातून उपलब्द होत आहे. या कार्डची किंमत तुलनात्मक दृष्ट्‍या अत्यंत कमी आहे आहे. या व्यतिरिक्त काही मार्गदर्शन अथवा सुविधांची गरज भासली तर मार्गदर्शनासाठी फौंडेशनच्या वतीने तज्ञ शिक्षक इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध आहेतच. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थी, गृहिणी आणि नोकरदार मंडळीना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.
राज्यसेवा मोबाईल मेमरी कार्ड कोर्स – वैशिष्ठे
• प्रत्येक विषय व टॉपिकनुसार स्वतंत्र व्हिडीओ लेक्चर्स, 640 हून अधिक HD क्वालिटी व्हिडीओ लेक्चर्स
• प्रत्येक मुद्यानुसार सुलभ सादरीकरण
• कोर्सच्या कालावधीत आपल्या वेळेनुसार कितीही वेळा लेक्चर्स पाहण्याची सुविधा
• विषयानुसार व्हिडीओ लेक्चर्स, नोट्स, १ ली ते १२ वी मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय ई- बुक्स…
• सरावासाठी प्रश्नसंच, करियर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार, तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने …
• स्पर्धा परीक्षांतून यशस्वी झालेल्या यशवंतांची , अधिकारी यांची प्रेरणादायी यशोगाथा आणि बरच काही ..
• राज्यसेवा ,PSI/STI/ASO, सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स..
बँकिंग – मोबाईल मेमरी कार्ड कोर्स- वैशिष्ठे :
• विषय व टॉपिकनुसार स्वतंत्र व्हिडीओ लेक्चर्स
• 240 हून अधिक HD व्हिडीओ लेक्चर्स
• प्रत्येक मुद्यानुसार सुलभ सादरीकरण
• कोर्सच्या कालावधीत आपल्या वेळेनुसार कितीही वेळा लेक्चर्स पाहण्याची सुविधा
• विषयानुसार व्हिडीओ लेक्चर्स, नोट्स, १ ली ते १२ वी मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय ई- बुक्स…
• इंग्रजी व हिंदी माध्यमातून सरावासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज व संदर्भ ई -बुक्स, करियर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार, तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने …
• स्पर्धा परीक्षांतून यशस्वी झालेल्या यशवंतांची , अधिकारी यांची प्रेरणादायी यशोगाथा आणि बरच काही ..
• IBPS, SBI, RRB, SSC, Railway, LIC, MSEDCL, POST इ. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स..
यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!