महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शेवटची संधी

 

पुणे: ‘पेरा इंडिया’(प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन), या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि अग्री इंजिनिअरिंग या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शेवटची संधी म्हणून ऑनलाईन पेरा सीईटी – 2021 ही परीक्षा घेत आहोत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा 19 ते 20 ऑक्टोबर 2021 दरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी 17 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. या परीक्षेचा निकाल 26 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि पेराचे उपाध्यक्ष श्री. भरत अग्रवाल यांनी दिली.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना जेईई आणि एमएच-सीईटीच्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्या विद्यार्थ्यांसाठी पेरा इंडिया या संघटनेतर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शेवटची संधी म्हणून 19 ऑक्टोबरला ऑनलाईन सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.खासगी विद्यापीठांच्या संघटनेद्वारे 19 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘पेरा’सीईटीच्या आधारे राज्यातील विद्यार्थ्यांना 14 खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना घरात बसूनच ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे, विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोर्फेशनल युनिव्हर्सिटी, पुणे, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, पुणे, संदीप विद्यापीठ, नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद, एमआयटी डब्ल्युपीयु युनिवव्हर्सिटी, पुणे, डी.वाय. पाटील विद्यापीठ, अँबी पुणे, विजयभूमी युनिवर्सिटी, मुंबई, सोमय्या विद्यापीठ, मुंबई, डीवाय पाटील अग्रीकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ, कोल्हापूर ही विद्यापीठ पेरा संघटनेचे सदस्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!